पिंपळ पुजा सर्व कामनापूर्तीसाठी

दर शनिवारी पिंपळाला दुध + पाणी व काळे तीळ वाहणे. करगोटा, रेशमी लंगोटी ( कापड ) , यज्ञोपवीत ( जान्नवे ), गंध, तांदुळ, फुले, वाहणे. उदबत्ती लावावी. कणकीचा दिवा तेल टाकून लावावा. फुटाणे-गुळ नैवेद्य दाखवावा. दोन विडयाची पाने, एक सुपारी, दक्षिणा ठेवावी. फुले, तांदुळ वाहन मनोकामना सांगावी, नमस्कार करावा, तसेच १०८ प्रदक्षिणा घालाव्या व घराजवळील मंदिरात रोज दर्शनासाठी जावे. मंदिरातल्या देवाला फुले वाहणे ,  नमस्कार करावा, रोज मंदिरात दिवा लावावा. ११ प्रदक्षिणा घालाव्या. कुलदेव - कुलदेवीचे दर्शन घ्यावे .

मुलाच्या लग्ना करीता :-

पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् । 
तारिणी दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम् ।।  जपसंख्या - 108

मुलीच्या लग्नाकरिता:-

जपसंख्या :- 108

हे गौरीशंकर अर्धागि याचं शंकर प्रिया। 
तथामां कुरु कल्याणि कान्त कान्तां सुदुर्लभाम्।। 
गणपतीला रोज हळद लावावी.
ज्वारी तेल, हळद लाऊन-महादेवाला वाहणे.
मंगळवार / शुक्रवार कोणत्याही देवीला फुलांचा गजरा वाहणे

संततीकरिता :-

जपसंख्या :- 108

देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते। 
देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः।।

सर्व संकटे दूर होण्याकरिता 

जप संख्या- 108

हरं हरि हरिश्चंद्रं हनुमान हलायुधं । 
पंचकंवै स्मरे नित्यम घोर संकट नाशनं ।।


लक्ष्मी प्राप्तीसाठी :

जप संख्या- 108

ॐ श्रीं हीं श्रीं कमले कमलालये । 
प्रसीद प्रसीद ॐ श्रीं हीं श्रीं महालक्ष्म्यै नमः ।।


Post a Comment

0 Comments